Clash over old dispute in Bhusawal : Crime against three भुसावळ : गत चार महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी एकास मारहाण केली. ही घटना तालुक्यातील वरणगाव रोडवरील गुरूवार, 22 सप्टेंबर रोजी रात्री 9.45 वाजता महामार्गावरील निर्मल ढाब्यासमोर घडली. याप्रकरणी गुरूवार, 24 दुपारी दिड वाजता बाजारपेठ गुन्हा दाखल करण्यात आला.
डोक्यात मारला दांडा
वरणगाव येथील रहिवासी रूपेश गोपाळ चौधरी (रा. गांधी चौक, वरणगाव) यांना गेल्या चार महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाच्या वादावरून रवींद्र काशीनाथ चौधरी, संकेत अनिल इंगळे, सागर व शक्तीमान (दोन्ही जणांचे पूर्ण नाव माहिती नाही, रा. कपिलवस्ती, वरणगाव) यांनी रूपेश याला मारहाण केली. यावेळी त्यांनी लाकडी दांडा डोक्यात व पायाला मारल्याने रूपेश जबर जखमी झाला. त्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार श्यामकुमार मोरे पुढील तपास करीत आहे.