चार मातांचा आई गौरव पुरस्कार देऊन गौरव

0

माकर प्रतिष्ठानचा उपक्रम

दापोडी : कै.पांडुरंग धोंडीबा माकर प्रतिष्ठान पिंपळे निलख व कै. शांताराम बाईत प्रतिष्ठान यांच्यावतीने जागतिक मातृदिनानिमित्त चार मातांना आई गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कै. चंद्रभागा भोसले यांच्या स्मरणार्थ आई गौरव पुरस्काराचे आयोजन केले होते. दापोडी येथील ज्येष्ठ नागरिक हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला उद्योजक विश्‍वजित पाटील, सामाजिक कार्यकर्ते मदन कोठुळे, सतीश पाटील, नगरसेवक रोहित काटे, समीर शेख, अमोल काटे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक माकर, रवींद्र बाईत, श्रीकांत इबडे आदी उपस्थित होते. यावेळी कमल काटे, सरस्वती काटे, मुक्ताबाई शेळके, योगिनी निंबाळकर यांना शाल श्रीफळ मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

मुलांवर लक्ष देण्याची गरज
उद्योजक विश्‍वजित पाटील म्हणाले की, आजच्या मातांनी मुलांवर जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे. दीपक माकर म्हणाले की, आज आपल्या माता-पित्यांनी विरंगुळा केंद्रात न जाता आपल्या लहान मुलाबरोबर वेळ घालविला पाहिजे. त्यामुळे मुले वाईट मार्गावर जाणार नाहीत. माधुरी बाईत यांनी सूत्रसंचालन केले. दत्तात्रय भोसले यांनी आभार मानले.