यावल : प्रेम आंधळे असतं असे म्हणतात या वाक्याला साजेशी घटना यावल तालुक्यातील नायगावच्या पीडीत पतीसोबत घडली. गतवर्षी कुठल्यातरी कारणावरून पत्नीशी भांडण झाले अन् संतापात तिने घर सोडले मात्र जाताना पत्नीने नऊ वर्षीय मुलासह आठ व सहा वर्षीय मुलगी व सहा महिन्याच्या बाळाला सोडून थेट माहेर धोपा, ता.भगवानपुरा, जि.खरगोन गाठले व पतीला सोडून तरुणाशी विवाह केला. वर्षभरानंतरही पत्नी येत नसल्याने पती भेटण्यासाठी गेल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने पतीने यावल पोलिसात पत्नीसह सासरा व पत्नीशी बेकायदा लग्न करणार्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला.
घटस्फोट न घेता केला दुसरा विवाह
नायगाव, ता.यावल येथील प्यारसिंग भाया बारेला यांच्या फिर्यादीनुसार त्यांची पत्नी बोंदरीबाई बारेला (38), तिचे वडील तुताराम अंकर्या बारेला व बेकायदा संसार थाटलेल्या भल्या वास्कले विरुद्ध यावल पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.