जळगाव : शहरात बर्याच दिवसांपासून मोबाईलवर बोलत असल्याल्या इसमांच्या हातातून मोबाईल हिसकवून चोरी करणार्या टोळीने धुमाकुळ घातला होता. मात्र, या टोळीचा शहर पोलीसांनी पर्दाफाश करत असून चार जणांना अटक केली आहे. तसेच चौघांना पोलीस खाक्या दाखवताच चोरट्यांनी चोरीची कबुली दिसून असून त्यांनी चार मोटारसायकली व सात मोबाईल पोलीसांना काढून दिले आहे. यातच शहर पोलीसांना 11 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले.
वाघनगर येथील रहिवासी बाळासाहेब सोनार हे 11 डिसेंबर रोजी शहरातील गोलाणी मार्कैजवळून जात असतांना विना नंबरच्या गाडीवरून आलेल्या इसमांनी त्यांच्या हातातून मोबाईल हिसकवून चोरी केला होता. यानंतर स्टेट बँकेच्या जवळून मोबाईल बोलत पायी जात असलेल्या तरूणांच्या हातातून धुमस्टाईलने आलेल्या इसमांनी मोबाईल हिसकावून पोबारा केल्याची घटनाही घडली होती. याप्रकरणी शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहरात धुकस्टाईलने मोबाईल चोरीच्य वाढते प्रमाण लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोनि. प्रदिप ठाकुर यांनी सफै. वासुदेव सोनवणे, अविनाथ कांबळे, संजय शेलार, विजयसिंग पाटील, प्रितमसिंग पाटील, इमरान सैय्यद, सुधीर साळवे, संजय हिवरकर, अमोल विसपुते, संजय भालेराव, दुष्यंत खैरनार, अकरम शेख, गणेश शिरसाळे अशांचे पथक तयार केले.
संशयितांना अटक
पथकाला काही संशयित मोबाईचा लॉक उघडण्यासाठी गोलाणीतील मोबाईल दुकानात आले असल्याची गुप्त माहिती मिळाली. पथकोन लागलीच गोलाणी मार्केट गाठत संशयित अमोल गोकुळ पाटील, पवन प्रभाकर चौधरी, सागर निवृत्ती हिवाळे यांना ताब्यात घेतले. यानंतर अमोल याला पोलीस कोठडीत असतांना पोलीसांनी खाक्या दाखवल्या असता त्याने पंकज नथ्थु सपकाळे हा देखील सोबत असल्याचे सांगत चोरीची कबुली दिली. पथकाने गुरूवारी 14 रोजी पंकज याचा शोध घेत शहरातून अटक केली.
11 गुन्हे उडकीस आणले
पोलीसांनी चौकशी केली असता अमोल पाटील व पंकज सपकाळे या दोघांनी तीन मोटारसायकली व सात मोबाईल पोलीसांना काढून दिले आहेत. तर पवन चौधरी व सागर हिवाळे या दोघांनी एक चोरी केलेली मोटारसायकल काढून दिली. अशा एकूण 3 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल मोबाईल चोरट्यांनी पोलीसांनी काढून दिला असून पोलीसांनी चार मोटारसायकली व सात मोबाईल जप्त केले आहे. यातच शहर पोलीसांना शहरातील तिन पोलीस ठाण्यातील 11 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहेत.