सुलेमानी पत्थर विक्रीच्या नावाने चौघांनी केली होती मारहाण
मुक्ताईनगर- जुने सुलेमानी पत्थर देतो असे सांगून चारठाणा शिवारात नेऊन चार आरोपींनी भाला व कोयत्याने मारहाण करत धमकी देऊन चार युवकांची 1 लाख 77 हजार रुपये ची फसवणूक केल्याची घटना 3 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास चारठाणा शिवारात घडली. फिर्यादी संतोष शिवराम जाधव वय 43, सेक्युरिटी फॉर्स, वायले नगर ,कल्याण(प), मूळ राहणार इगतपुरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास चारठाणा शिवारात मनोज नंदू तायडे राहणार वडोदा, मनेलं पांडवसिंग चव्हाण व दोन अनोळखी अज्ञात व्यक्तींनी फिर्यादीसह त्याच्या 3 मित्रास मारहाण करत 1 लाख 77 हजार रुपयांची लूट केली आहे.फिर्यादी व त्यांचे मित्र महिंद्रा झायलो कंपनीची गाडी क्रमांक (एमएच 04, ईएच 8234) नेचारठाणा येथे गेले असता संबंधित आरोपींनी सुलेमानी पत्थर देतो असे सांगून अज्ञात ठिकाणी नेले. त्यांच्यासोबत दोन अनोळखी इसम होते. हातात भाले व कोयत्याने मारहाण करत धमकी दिली. यावेळी एमआय नोट फाईव प्रो या कंपनीचा 11 हजार रुपये किमतीचा मोबाईल व तसेच अठरा हजार रुपये रोख व कॅनरा बँकेचे आणि एसबीआयचे क्रेडिट कार्ड डेबिटकार्ड सागर जाधव यांच्याकडे कडून काढून घेतले. तसेच विश्वास गणेश पाटील या युवकाकडून 62 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी आणि सॅमसंग जे सेवन हा मोबाईल तसेच संजय शिवराम जाधव यांच्याकडे 5 हजार रुपये रोख व टायटन कंपनीचे घड्याळ हिसकावून घेतली आहे. आरोपींविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस उपनिरीक्षक कैलास भारसके करत आहेत.