भुसावळ/नंदुरबार : मान्यताप्राप्त ठेकेदाराचे विविध कामे केल्यानंतरचे प्रलंबित 84 लाखांचे बिल काढण्यासाठी 43 लाख 75 हजारांची लाच मागून त्यातील टोकन म्हणून चार लाखांची लाच स्वीकारताना अक्कलकुवा जिल्हा परीषद बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता सुनील दिगंबर पिंगळे (48), सहाय्यक अभियंता संजय बाबुराव हिरे (52) व खाजगी पंटर अभिषेक सुभाष शर्मा (32) यांना नंदुरबार एसीबीच्या पथकाने बुधवार, 23 मार्च रोजी दुपारी एक वाजता नंदुरबार शहरातील एकलव्य विद्यालयासमोरील श्री सॉ मिलजवळून अटक केली होती. संशयीत आरोपींना गुरुवारी नंदुरबार न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक समाधान महादू वाघ व निरीक्षक माधवी एस.वाघ करीत आहेत.