यावल : तालुक्यातील चितोडा येथील मनोज संतोष भंगाळे या 35 वर्षीय तरुणाच्या खूनप्रकरणी अटकेतील महिलेसह तिघांना सोमवारी न्यायाधीश एम. एस.बनचरे यांनी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
उधारीच्या चार लाखातून खून
यावल तालुक्यातील चितोडा येथील मनोज संतोष भंगाळे या 35 वर्षीय तरुणांकडून गावातील कल्पना शशिकांत पाटील या महिलेने चार लाख रुपये उसनवारीने घेतले होते. भंगाळे उसनवारीचे पैसे वारंवार मागत असल्याच्या कारणावरून महिलेने देवानंद बाळू कोळी (यावल, ह.मु.चितोडा) व मितेश उर्फ मिग्नेश भरतसिंग बारेला (निमगाव) यांच्या मदतीने मनोज भंगाळे याचा रविवारी रात्री खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह देवानंद बाळू कोळी व मितेश उर्फ मिग्नेश भरतसिंग बारेला यास सोमवारी अटक केली. अटकेतील संशयीतांना मंगळवारी यावल न्यायालयात उपस्थित केले असता 29 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास निरीक्षक राकेश माणगावकर, फौजदार विनोद खांडबहाले करीत आहेत.