अमळनेर । तालुक्यातील 4 गावाच्या लोकनियुक्त सरपंचानी पदभार स्वीकारला असून तीन गावांचे उपसरपंच बिनविरोध करण्यात आले तर कोंढावळ येथे एकही अर्ज न आल्याने उपसरपंचपद रिक्त राहिले आहे. तालुक्यातील सुंदरपट्टी येथे सरपंच सुरेश अर्जुन पाटील यांनी पदभार घेतला तर उपसरपंच म्हणून मधुकर तुकाराम पाटील यांची बिनविरोध निवड झाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी पी.डी.धनगर यांनी काम पाहिले, चोपडाई येथे सरपंच जयश्री संजय पाटील यांनी पदभार तर उपसरपंच म्हणून देविदास रतन पाटील यांची, गंगापुरी खापरखेडा येथे सरपंच उषा पाटील यांनी पदभार तर उपसरपंच पितांबर रावजी कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर कोंढावळ येथे उपसरपंच पदासाठी एकही अर्ज न आल्याने ते पद रिक्त ठेवण्यात आले आहे.