चार वर्षांच्या बालिकेवर व्यापार्‍याचा बलात्कार

0

नाशिक । आइस्क्रीमचे आमिष दाखवून चार वर्षीय बालिकेवर फरसाण व्यापार्‍याने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यावर महिलांनी मोर्चा काढून नराधमाला कठोर शासन करण्याची मागणी केली आहे. सिन्नरफाटा भागातील व्यापारी सुभाष प्रकाशचंद्र झवर याने शेजारच्या बालिकेला घरात बोलावून दरवाजा बंद करून लैंगिक अत्याचार केले.

संशयित सुभाष प्रकाशचंद्र झवर वर नाशिकरोड पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालिका अस्वस्थ झाल्यानंतर तिच्या आईने तिची विचारपूस केली तेव्हा हा प्रकार लक्षात आला. या बुधवारी रात्री त्याने बालिकेच्या शरीरावर विविध भागांचा चावा घेतला व लैंगिक अत्याचार करून गुप्तांगही जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.