मुंबई : बॉलीवूडमध्ये वादविवाद होणे हे काही नवीन नाही. कधी कधी एखाद्या कलाकाराने दुसऱ्याविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद बऱ्याच वर्षांनी उमटतात. याचा उदाहरण, जवळपास चार वर्षांपूर्वी एका रिअॅलिटी शोमध्ये इमरान हाश्मीने ऐश्वर्या राय बच्चनला ‘प्लास्टिक’ म्हटलं होतं. त्यावर आता ऐश्वर्याने उत्तर दिलं आहे.
ऐश्वर्या म्हणाली, ‘माझ्याबाबतची अत्यंत वाईट टिप्पणी मी आजपर्यंत कोणती ऐकली असेल तर ती म्हणजे, मी खोटी आणि प्लास्टिक आहे.’ २०१४ मध्ये ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये ऐश्वर्याचा विषय सुरू असताना इमरानने तिला ‘प्लास्टिक’ म्हटलं होतं. यानंतर सारवासारव करताना ‘मी ऐश्वर्याचा मोठा प्रशंसक असून, दोन वर्षांपूर्वी मस्करीत केलेल्या टिप्पणीसाठी मी तिची माफी मागणार आहे. यात काही व्यक्तीगत घेण्यासारखं नव्हतं,’ असंदेखील इमरानने सांगितलं होतं.