चार वर्षांनंतर शांताकुमार श्रीशांत परतला क्रिकेटच्या मैदानात

0

कोच्ची (केरळ) । क्रिकेटपटू एस. श्रीशांतवर फिक्सिंगप्रकरणी घालण्यात आलेली बंदी तब्बल 4 वर्षांनंतर हटवण्यात आली. त्यानंतर मंगळवारी श्रीशांतने मैदानावर पुनरागमन केले.

श्रीशांत एका प्रदर्शनीय सामन्यात खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. मैदानात येताच स्टेडिअमधील प्रेक्षकांनी त्याचे जोरदार स्वागत केले. केरळ उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच श्रीशांतवरील बंदी हटवण्याचे आदेश बीसीसीआयला दिले होते. दिल्ली पोलिसांनी 17 मे 2013 साली मुंबईतून श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. काही दिवस श्रीशांतची रवानगी तिहार जेलमध्येही करण्यात आली होती. मंगळवारी प्रोड्यूसर इलेव्हन वि. प्लेबॅक सिंगर इलेव्हन या दोन संघामध्ये सामना पार पडला. प्लेबॅक सिंगर इलेव्हन संघात श्रीशांतचा समावेश होता. या सामन्यात श्रीशांतने फलंदाजीने सुरुवात केली. या सामन्यानंतर बोलताना श्रीशांत म्हणाला की, मैदानावर परतल्याने मला खूप आनंद झाला आहे. भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन.