भुसावळ। पंचायत समितीला तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूर्ण वेळ गटशिक्षणाधिकारी लाभल्याने शैक्षणिक वर्तुळातून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेले प्रभारीराज संपुष्टात आले आहे.
हरी सावकारे यांच्या सेवानिवृत्तीनंतर गणवेष घोटाळ्यात गुन्हा दाखल झालेल्या कल्पना चव्हाण यांच्याकडे काही दिवसांसाठी पदभार हिोता. त्यांचा पदभार नंतर शिक्षण विस्तार अधिकारी पी..एन.ठाकरे यांच्याकडे आला. तेही सेवानिवृत्त झाल्यानंतर शालेय पोषण आहार अधीक्षक आर.एस.बोकाडे व त्यांच्यानंतर विजय पवार यांनी दोन वर्ष प्रभारी पदभार सांभाळला. त्यानंतर सौमित्र अहिरे यांच्याकडे पदभार आला व नंतर शासनाने रावेरचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी धीमते यांची पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी म्हणून बदली झाली. त्यांनी बुधवारी भुसावळ पंचायत समितीत गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभारही स्वीकारला.