टोकियो- पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपान दौऱ्यावर आहे. त्यांनी टोक्योमध्ये मेक इन इंडिया संदर्भातील एका कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी त्यांनी काही वर्षांपूर्वी मी भारतात मिनी जपान करण्याविषयी बोललो होतो. आज माझ्यासाठी आनंदाची बाब आहे कि, तुम्ही मोठया संख्येने भारतात काम करत आहात असे मोदींनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही आहेत.
२०१४ मी सरकारची जबाबदारी स्वीकारली तेव्हा वर्ल्ड बँकेच्या व्यवसाय सुलभतेच्या क्रमवारीत भारत १४० व्या स्थानी होता. आता याच यादीत भारत १०० व्या स्थानी पोहोचला आहे. व्यवसाय सुलभतेच्या क्रमवारीत आणखी चांगले स्थान मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे मोदी म्हणाले.