Kidnapping of four-year-old boy in Jalgaon : Case against Kopargaon suspect जळगाव : शहरातील चार वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण करण्यात आले. प्रकरणी सोमवारी 5 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव महानगर पालिकेच्या शेजारी असलेल्या रोडवर ही घटना घडली.
खेळताना चिमुकला गायब
जळगाव शहरात गणेशोत्सव असल्याने शहरातील महापालिकेच्या आवारात किरकोळ खेळणी व फुगे विक्रेत्यांनी दुकाने लावलेली आहेत. दरम्यान कोपरगाव अहमदनगर येथील महिला शबाना सलमान चव्हाण यांनी देखील फुगे विक्रीचे दुकान लावलेले आहे. या महिलेसोबत तिचा चार वर्षाचा मुलगा आयुष देखील आहे. रविवार, 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास महिला जळगाव महापालिकेच्या आजूला असलेल्या गल्लीत फुगे विक्री करत असतांना तिच्या नातेवाईकाच्या मुलासोबत तिचा मुलगा आयुष देखील खेळत होता. आयुष तिला खेळतांना दिसून आला नाही.
कोपरगावच्या संशयीतांविरोधात गुन्हा
यापूर्वी शबाना चव्हाण हिचा तिचे नातेवाईक नितीन लाला भोसले यांच्याशी दुकान लावण्याच्या जागेवरून वाद झाला होता. त्यानेच मुलाचे अपहरण केल्याची तक्रार शबाना चव्हाण यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली. सोमवार, 5 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी नितीन लाला भोसले (रा.कोपरगाव, जि.अहमदनगर) याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.