चार शिक्षकांवर गुन्हा दाखल

0

बारामती । काटेवाडीतील शिक्षिका विजया विजय गिरीगोसावी यांच्या आत्महत्येप्रकरणी चार शिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे प्राथमिक शिक्षण संघटना, महिला अन्याय निवारण संघटना व महिला संघटना याप्रकरणी मौन बाळगून का आहेत? हा बारामतीकरांना पडलेला प्रश्‍न आहे. एरवी छोट्या छोट्या घटनांमध्ये दखल घेणार्‍या संघटना या गंभीर प्रकरणी गप्प का आहेत? अशीही चर्चा सुरू आहे.

9 सप्टेंबर 2017 रोजी ही घटना घडली होती. विजया यांनी काही सहकारी शिक्षक व अधिकार्‍यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. विजया यांचे पती विजय यांनी बारामती ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बारामती ग्रामीण पोलिसांनी शिर्सुफळ केंद्राचे सर्जे, राणे सर, नंदकुमार जाधव, सुलोचना गायकवाड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.