चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यातील एका कर्मचार्यास चार हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. चाळीसगाव शहरातील सिग्नल चौकात जळगाव एसीबीच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
चार हजारांची लाच भोवली
तक्रारदार यांच्या मुलीचा छळ केल्याबाबत चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात भादंवि 498 अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासह चार्जशीट पाठवण्यासाठी पाच हजारांची लाच लाचखोर कर्मचार्याने मागितली होती मात्र चार हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजोग बच्छाव, निरीक्षक एन.एन.जाधव व कर्मचार्यांनी सापळा यशस्वी केला.