चार हातभट्ट्या उध्वस्त; चौघांना अटक

0

अमळनेर । येथील बहादरपूर रोड वरील कंजरवाडा येथे सकाळी पोलिसांनी ’ऑपरेशन क्रॅक डाऊन’ राबवून 4 गावठी हातभट्टी उध्वस्त करून 22 हजाराची गावठी दारू जप्त केली आहे. पोलिसांनी केलेल्रा रा कारवाईमुळे अमळेनर तालुक्रात हातभट्टी बनविणार्‍रांचे धाबे दणाणले आहे. रा कारवाईत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकूण 21 हजार 650 रुपयाचा माल जप्त
बहादरपूररोड वरील कंजरवाडा परिसरात गावठी हातभट्टी मोठ्या प्रमाणार सुरू असल्राची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्रानुसार पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी आज 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 ते 7 दरम्यान ’ऑपरेशन क्रॅक डाऊन’ राबविले. त्यावेळी तेथील बिंदिया आंनदा कंजर हिच्याकडून 6 हजार 800 रुपयांचे कच्चे रसायन व गावठी दारू जप्त केली. रिटा श्रीकांत कंजर हिच्याकडून 4 हजार 750 रुपयांचे रसायन व दारू जप्त केली आहे. तसेच बेला वसंत कंजर कडून 5 हजार 100 रुपयाची दारू व रसायन आणि गीताबाई देवसिंग कंजर कडून 5 हजार रुपयांचे रसायन व दारू असा एकूण 21 हजार 650 रुपयाचा माल जप्त करण्रात आला असून चार आरोपींविरोधात कलम 65 (फ,इ,ब) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. चौघांना ताब्रात घेतले असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पो.ना. सुनील पाटील, किशोर पाटील, हे.कॉ.बापू साळुंखे करीत आहेत. यावेळी पो.नि. विकास वाघ, पो.कॉ. नीलम चव्हाण, भूषण बाविस्कर, सचिन पाटील, रेखा ईशी कर्मचारी यांनी कारवाई केली.