एक तास वाहतुक विस्कळीत
जळगाव । शहरातील ईच्छादेवी चौकात भरधाव वाळूने भरलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सिग्नल लावलेल्या दुभाजकावर चढला. ही घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या घटनेत ट्रक चालक जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटना घडल्यानंतर ट्रक दुभाजाकवर होता तर सिग्नल पोल तुटलेल्या अवस्थेत सिंधी कॉलनीकडून येणार्या रस्त्यावर पडल्याने एकाबाजूकडील वाहतुक बंद झाली. त्यामुळे भुसावळ, आकाशवाणी चौक तसेच शिरसोलीकडून येणार्या वाहतुक तब्बल एक तास खोंळबली होती. जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे व शहर वाहतुकचे पोलिस कर्मचार्यांनी येवून वाहतुक सुरळीत केली.
मोठा अनर्थ टळला
प्रत्यक्षदर्शी कडून मिळालेल्या माहितीनूसार, आकाशवाणी चौकाकडून ट्रक चालक पवन नन्नवरे (वय 23) रा. बांभोरी हा एमएच 19 झेड 5402 या क्रमांकाचा वाळूने भरलेला ट्रक भरधाव वेगाने ईच्छादेवी चौकाकडे येत होता. याच वेळी अचानक ट्रक समोरील चारचाकी वाहनाने ब्रेक मारल्याने चालक नन्नवरचे ट्रक वरील नियंत्रण सुटले. आणि ट्रक थेट चौकात लावलेल्या सिग्नलवरील दुभाजकावर आदळला. ट्रक दुभाजकावर चढला. या घटनेत सिग्नलचा लोंखडी खांब रस्त्यावर कोसळला. तर ट्रक चालक नन्नवरेच्या पायाला दुखापत झाल्याने तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी नागरिकांनी नेले. भरधाव वेगाने येणारे ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने चालकाने दुभाजकावर ट्रक चढवीला. यावेळी सिंधी कॉलनीकडील रस्त्यावर सिग्नल बंद असल्याने अनेक वाहने उभे होते. त्यामुळे दुभाजक नसते तर मोठा घटना घडून जीवातहानी झाली असते.
वाळू व्यवसायीकांची धाव !
घटना घडल्यावर दहा ते पंधरा मिनीटातच वाळू व्यवसायाकांनी ईच्छादेवी चौकात धाव घेतली. ट्रक बाजुला करण्यासाठीचे व्यवसायीकांनी हालचाली केल्यानंतर अर्धातासात क्रेन मागवून वाळुने भरलेला बाजू करण्याचे काम सुरू केले. याचवेळी आकाशवाणी चौकाकडून डब्लू.बी 11 डी 8692 या ट्रकचा व एमएच 18 एजे 9131 चारचाकीला कट लागला. त्यामुळे पुन्हा मोठी दुर्घटना होता होता थोडक्यात वाचली.