खड्ड्यात बस गेल्याने प्रवाशाचे मात्र डोके फुटले
यावल- तालुक्यातील बोरावल येथे गावाबाहेर नदीवरील पुलाजवळ भररस्त्यात मोठा खड्डा असून या खड्ड्याचा अंदाज न आल्यानेे यावलशश-बोरावल ही एस.टी.बस थेट रस्त्याच्या कडेला कलंडणार होती मात्र चालकाच्या प्रसंगवधानाने प्रवासी बालं-बाल बचावले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या बसमधील समाधान पाटील हा तरुण मात्र बसमध्ये आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर दवाखान्यात उपचार करण्यात आल्यानंतर डोक्याला दोन टाके लागले. दरम्यान, या प्रकारानंतर खराब रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून आतातरी रस्त्यांची दुुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.