चालकानेच कार ढकलली नाल्यात

0

जळगाव प्रतिनिधी । तीन जणांनी मारहाण करुन कार पळवून नेल्याची बतावणी करणार्‍या कार चालकानेच कार नाल्यात ढकलल्याची घटना उघडकीस आली आहे.

शनिवारी बजरंग बोगद्याजवळ असलेल्या नवसाच्या गणपती मंदिराजवळून स्वीप्ट डिझायर कार जात असताना अचानक एक तरूण समोर आल्याने चालक स्वप्नील नामदेव वाघ याने कार थांबविली. लगेचच तिघांनी स्वप्नीलची कॉलर पकडून गाडीतून त्यास बाहेर काढले व कार पळवून नेल्याची माहिती स्वप्नीलने जिल्हापेठ पोलीस स्टेशनला
त्यानंतर पोलिसांनी कारच्या शोधार्थ तपासचक्रे फिरविली असता सुरत रेल्वेगेट जवळील एका नाल्यात ही कार आढळून आली. याप्रसंगी केलेल्या चौकशीत कारचालक काही तरी दिशाभूल करीत असल्याचे पोलिसांचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली असता चालक हा नशेत होता. नशेच्या धुंदीत चालकाकडून गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी नाल्यात गेली. त्यामुळे ही बाब गाडी मालकाला सांगितली तर, अडचणी निर्माण होतील, म्हणून चोरट्यांनी गाडी थांबवली व मारहाण करुन कार चोरुन नेल्याचा बनाव केला आणि तशी फिर्याद कारचालकाने जिल्हापेठला पोलीस स्टेशनला दिली, अशी कबुली चौकशी दरम्यान स्वप्नील वाघ याने पोलिसांना दिली.