शहादा। येथील बसस्थानकावरून अक्कलकुवा ते अमळनेर ही विनाथांब बसमध्ये काही विद्यार्थी मनमानी करीत बसमध्ये बसले. चालकाने त्यांना सांगितले की, संबधित गावास बसपास नाही.याचा राग विद्यार्थ्याना येताच त्यांनी धिंगाणा घातला. एकाने तर चालकास दगड मारण्याचा प्रयत्न केला. वेळीच स्थानकप्रमुख यांच्या मध्यस्थिने वातावरण निर्वाळले होते.अक्कलकुवा आगाराची अक्कलकुवा ते अमळनेर ही विनाथांबा बस दि.11 रोजी सायंकाळी 4.40 वाजेदरम्यान शहादा बस स्थानक आवारात येवून पोहचली.त्या दरम्यान शहादा बसस्थानक आवारात दोंडाईचाकडे जाणारे विद्यार्थी विद्यार्थीनी हे त्या बसमध्ये बसले होते. विद्यार्थीनीची संख्या जास्त असल्याने काही विद्यार्थी देखील त्याच बसमध्ये जाणार अशी आग्रही भूमिका घेतली. बसचालक वाहक यांनी विद्यार्थीना म्हटले की,ही बस विनाथांब आहे.काही विद्यार्थी दुसर्या बसमध्ये यावे असे म्हटल्यावर काही विद्यार्थी आरडा-ओरड करून चालक-वाहक यांच्यावर धावून आले.
विद्यार्थ्याने दगड चालकाकडे फिरकविला
त्याचवेळेस एका विद्यार्थ्याने दगड हातात घेत चालकाकडे फिरकविला स्थानकप्रमुख संजय कुलकर्णी यांनी त्यास थांबविले व विद्यार्थ्यांना समजविण्याचा प्रयत्न झाला. विद्यार्थी एवढ्यावरच न थाबता विद्यार्थ्याना बस खाली उतरविले. ते विद्यार्थी सप्तशॄंगीमाता मंदिर स्टाप जवळ येऊन अक्कलकुवा अमळनेर बस आल्यावर त्याबसला थांबवित काही विद्यार्थी पुन्हा चालकावर धावून गेले. स्थानकप्रमुख यांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले व पोलीसांना भ्रमणध्वनीने संपर्क करुन घटना कळवली. पोलीस येताच विद्यार्थी सैरावैरा झाले. सदरची घटना लहान असली तरी विद्यार्थी यांची बाजू एसटी मंडळाने व चालक वाहक यांची बाजू विद्यार्थ्यांनी समजून घेणे अनिवार्य आहे. बस जरी विनाथांबा होती तरी चालक-वाहकांनी प्रथम विद्यार्थीनींना स्थान देऊन मुलांनी दुस-या बसमध्ये यावे असे म्हटल्यावर राग येण्याचा प्रश्नच आला नसता व जो प्रकार घडला तो घडला नसता.या प्रकाराची बसस्टडवर चर्चा सुरू होती.