चालत्या विमानात अचानक राष्ट्रगीत सुरू झाल्याने प्रवासी चक्रावले

0

इंदूर । राष्ट्रगीताचा मान राखण हे आपण आपले कर्तव्य समजतो. त्याच्याशी आपण भारतीय कधीही तडजोड करत नाही. पण आपण विमानप्रवास करतोय. सीटबेल्ट बांधलाय. विमान सुरु आहे. आणि राष्ट्रगीत सुरू झाले तर ? हो अशीच घटना स्पाइसजेटच्या विमानात घडली आहे. स्पाइटजेटच्या कर्मचार्‍याच्या खोडसाळपणामुळे प्रवाशी अचंबित झाले. स्पाइसजेट’च्या ‘एसजी 1044’ हे विमान टेक ऑफ करण्यास सज्ज झाले.

प्रवाशांना सीटबेल्ट बांधण्याची सूचना देण्यात आली त्याप्रमाणे प्रवाशांनी आपले सीटबेल्ट बांधले. विमानाने आकाशात उड्डाण घेतले. पण विमान प्रवासात मध्येच राष्ट्रगीत सुरू झाले. राष्ट्रगीत सुरू असताना असू त्या जागेवर उभे राहणे हा आपला दंडक असतो म्हणून सुरू विमान सीट बेल्ट लावलेली माणसे चकवून गेली. थोड्यावेळाने राष्ट्रगीत अर्ध्यावर बंद करण्यात आले. या प्रकाराबद्दल याच विमानातील एक प्रवासी पुनीत तिवारी यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली. सीटबेल्ट बांधलेले असल्याने प्रवासी व क्रू मेंबरना राष्ट्रगीताचा मान राखता आला नाही. राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर मध्येच बंद करण्यात आले आणि ते पुन्हा सुरू करण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला. तिवारी यांनी या घटनेचा व्हिडिओ तयार केला असून या घटनेमुळे विमानकंपनीवरील विश्‍वास उडाल्याचे त्यांनी सांगितले. हे वृत्त समजताच सर्व माध्यमातून विमान कंपनीवर टीकेची झोड उठवली जात आहे. स्पाइसजेटला यासंबधी विचारले असता कंपनीने या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. ‘आमच्या क्रू प्रतिनिधीकडून गाणे लावण्याऐवजी चुकून राष्ट्रगीत लावले गेले. ते तात्काळ थांबविण्यातही आले, यामुळे आमच्या प्रवाशांना जो त्रास झाला, त्याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो,’ असं स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले.