चाळीसगांव : अमेरिकेतील ह्युस्टर्न राज्याची सौंदर्यवती व जळगांव जिल्ह्यातील माहेर असलेल्या शितल योगेश पाटील यांनी बुधवार 14 डिसेंबर 2016 रोजी त्यांचे काकांकडे चाळीसगांव येथे सदिच्छा भेट दिली असून यावेळी त्यांचेशी चर्चा केली असता, भविष्यात भारतातील चित्रपट सृ÷ष्टीमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाल्यास संस्था स्थापन करून अंध-अपंग व गोर गरीब जनतेची समाज सेवा करण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी जनशक्तिशी बोलतांना सांगितले. शितल योगेश पाटील या अमेरिका येथील ह्युस्टर्न राज्याच्या एक क्रमांकाच्या 2016 वर्षीच्या सौंदर्यवती असून त्यांचे काका मनोज रमेशराव भोसले यांचे घरी चाळीसगांव येथे सदिच्छा भेट देण्यासाठी आल्या होत्या.
गोर गरीब जनतेसाठी ह्युस्टर्न येथील फाऊंडेशनला दिले दान
शितल पाटील यांचे वडील भडगांव तालुक्यातील कोठली येथील मुळ रहीवाशी असून सध्या ते नाशिक येथे वास्तव्यास आहेत. शितल पाटील यांना साडेचार वषार्र्चा मुलगा व दोन वर्षाची मुलगी असून त्या व त्यांचे पती योगेश पाटील हे अमेरिकेमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असून एकाच कंपनीत नोकरीला आहेत. सहा वर्षापुर्वी त्यांचे लग्न झाले त्यानंतर ते अमेरिकेतच स्थायिक झाले आहेत. अमेरिका मधील ह्युस्टर्न राज्यात गोर गरीब जनतेच्या उद्धारासाठी फाऊंडेशन संस्थेच्या वतीने सौदर्यवतींच्या स्पर्धा भरवल्या जातात या स्पर्धांमध्ये सौ. शितल योगेश पाटील यांनी सन 2016 या चालू वर्षी प्रथमच भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्या ह्युस्टर्न राज्याच्या सौंदर्यवती तर पुर्ण अमेरिकेत 5 पैकी 4 थ्या क्रमांकाच्या सौंदर्यवती असल्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. या स्पर्धेत त्यांना मिळालेली रक्कम गोर गरीब जनतेसाठी काम करणार्या ह्युस्टर्न येथील फाऊंडेशन संस्थेला त्यांनी दान केल्याची माहीती यावेळी दिली. तसेच भविष्यात भारतामध्ये चित्रपट सृष्टीत अभिनय करण्याची ऑफर आल्यास अभिनय करून त्या माध्यमातून आलेल्या पैशांवर सामाजिक संस्था स्थापन करून त्या माध्यमातून गोर गरीब जनता, अंध, अपंग, अत्याचार पिडीत पुरूष व महीलांच्या उद्धारासाठी जनसेवा करणार असल्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखविले.
यांनी घेतली भेट
या संस्थेची जबाबदारी त्यांचे वडील रवि पाटील नाशिककर व काका मनोज रमेशराव भोसले यांच्याकडे देणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले. त्या चाळीसगांव येथील त्यांचे काकांकडे सदिच्छा भेट देण्यासाठी आल्या असता सह्याद्री प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दिलीप घोरपडे, खडकी बु ग्रा.प.चे माजी उपसरपंच व नॅशनल मिनरल वॉटरचे मुराद पटेल, जनशक्तीचे आरीफ खाटीक, विजय गायकवाड साईमतचे राहुल सोनवणे यांनी त्यांचा फुलहार गुच्छ देऊन सत्कार केला याप्रसंगी सौ. शितल पाटील यांचे आई-वडील, काका, मुले व नातेवाईक उपस्थित होते.