जळगाव : आसाम राज्यातील मणिपुर येथे गोळीबारात शहीद झालेला भारतीय जवान सागर धनगर यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी २ फेब्रुवारी रोजी चाळीसगाव तालुक्यातील तांबोळा या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. मोठा जनसमुदाय यावेळी होता. साश्रू नयनाने वीर जवानाला निरोप देण्यात आला. तालुक्यातील तांबोळे बुद्रक येथील सुपुत्र सागर रामा धनगर (२७) हे सेनापती (मणिपूर) येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झाले. ही घटना शनिवारी ३१ रोजी पहाटे दोन वाजता घडली.
सागर धनगर हे नोव्हेंबर २०१७ मध्ये ५, मराठा इन्फ्रंटी बटालियनमध्ये रुजू झाले होते. सागर यांचे पार्थिव १ रोजी दुपारी २ वाजता इंम्फाळ (मणिपूर) येथून गुवाहाटी (आसाम) येथे आणण्यात आले. तेथून ते मुंबई येथील विमानतळावरसांयकाळी ७.१५ वा. पोहचले. त्यांनतर ते मंगळवार, २ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मुळगावी आणण्यात आले.