चाळीसगावचे कलाशिक्षक धर्मराज खैरनार ‘स्वच्छता दूत’ पुरस्कार

0

कन्नड नगरपालिकेकडून पुरस्काराचे वितरण
चाळीसगाव – औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड नगरपालिकेतर्फे आयोजित ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत तालुकास्तरीय शालेय भित्तीपत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भित्तीपत्रक विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच स्वच्छता दूत म्हणून कला शिक्षकांचा गौरव करण्यात आला. त्यात चाळीसगाव येथील कलाशिक्षक धर्मराज खैरनार यांचा कन्नड नगरपालिकेतर्फे उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, तहसीलदार महेश सुधळकर, गटविकास अधिकारी परदेशी, नगरपरिषद मुख्याधीकारी नंदा गायकवाड, कन्नड नगराध्यक्ष स्वातीताई कोल्हे, गटनेते संतोषभाऊ कोल्हे सर्व नगरसेवक कन्नड यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संजय जाधव, रामेश्वर राठोड, रवींद्र साळुंके, प्रशांत देशपांडे आदींसह नगरपालिकाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन अनिता राठोड यांनी केले. आभार मुख्याधिकारी नंदा गायकवाड यांनी मानले.