जळगावात आयोजीत चित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
चाळीसगाव – येथील युवा चित्रकार कु.तेजल संजय नानकर हिचे चित्रप्रदर्शन दि, २ एप्रिल ते १५ एप्रिल पर्यन्त पु, ना, गाडगीळ अँड सन्स, यांच्या भव्य कलादालनात उत्साहात सुरू झाले असून या सृजन आर्ट चित्रप्रदर्शनाचे उदघाटन जिल्ह्यातील नामांकित विधीज्ञ अॅड. एस. के. शिरोड, अॅड. व्ही. आर. ढाके जळगाव, आई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद कोतकर, सचिव डॉ. चेतना कोतकर, चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांचे हस्ते थाटात झाले.
प्रदर्शनाची मान्यवरांकडून प्रशंसा
या प्रसंगी जेष्ठ विधिज्ञ शिरोडे यांनी कला सम्पन्न व्यक्ती नक्कीच जीवनात काहीतरी इतरांपेक्षा वेगळे साहित्य, कला,निर्मिती करून आपला ठसा उपटवत असते, तेजल ही उत्कृष्ट डिझाइनर होईल अशी खात्री असल्याचे सांगितले. अॅड. ढाके यांनी चित्रांचे कौतुक करतांना मुलींनाही ह्या क्षेत्रात प्रगतीच्या वाटा खुल्या आहेत, व तेजल मध्ये ते तेज आहे असे सांगितले.
डॉ. विनोद कोतकर यावेळी म्हणाले की चाळीसगाव नवरत्नांची खाण आहे, त्यातून केकी मूस सारखे जगप्रसिद्ध चित्रकार यांनीही चाळीसगांवचे नाव सतासमुद्रापलीकडे नेल. तसेच तेजलही आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून नक्कीच नाव कमवेल असे त्यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
या उदघाटन सत्राचे प्रास्ताविकात ऍड, संजय नानकर यांनी सांगितले की, माझी इच्छा कला क्षेत्राकडे नसताना देखील, तिच्या इच्छा शक्तीने तिने कलेचा विकास केला याचा मला आनंदच आहे, असे सांगताना ते भावनिक झाले. सुत्रसंचलन दिलीप शिंदे यांनी तर आभार वैशाली नानकर यांनी मानले. या प्रसंगी विलास मोराणकर, सरला मोराणकर, राजेंद्र गवळी, कला महाविद्यालयाचे प्राचार्य भारंबे, योगेश सोनार पु. ना. गाडगीळ आर्ट गॅलरीचे मॅनेजर खेमराज त्यांचे सर्व कर्मचारी,कला महाविद्यालयातील सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. या चित्र प्रदर्शनात नेचर, बॉटल आर्ट, शृंगार, तेज, चैतन्य या विषयावर कलाकृती बघावयास मिळतील, हे प्रदर्शन येत्या १५ एप्रिलपर्यंत पु.ना. गाडगीळ कलादालनात पाहण्यासाठी खुला राहणार असल्याचे युवा चित्रकार तेजल नानकर यांनी सांगितले.