चाळीसगावच्या दरोड्यात जखमी वृद्धाचा मृत्यू

0

चाळीसगाव ।शहरातील हिरापूर रोडवर 2 मार्चरोजी आदर्शनगरमध्ये घराचा कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात झोपलेल्या वृद्ध पतीपत्नीच्या डोक्यात लोखंडी कुसा मारून गंभीर जखमी केले होते. मारहाणीत महिलेचा जागीच मृत्यू झाला होता जखमी दगडू देवरे हे धुळे शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते.

आज सकाळी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. या दरोड्यानंतर पोलीस यंत्रणा कमालीची सतर्क झाली होती. आरोपींच्या शोधात औरंगाबाद, नगर, धुळे, नाशिक, जळगाव व हैद्राबाद येथे पथके रवाना करण्यात आली होती. नांदगाव येथे घरफोडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अशोक शिंदे (रा मालनवाडी ता भोकरदन) हा नाशिक मध्यवर्ती कारागृहात असल्याची माहिती चाळीसगाव पोलिसांना मिळाल्यावरून नांदगाव न्यायालयाच्या परवानगीने आरोपीस ताब्यात घेतले.