सहा महिन्यांचा मोबदला दिलाच नाही ; बैलगाडीसह उदरनिर्वाहाची साधने केली जप्त
नंदुरबार- तालुक्यातील ढडाने येथील ऊसतोड मजूर कामगारांची चाळीसगावच्या मुकादमाने आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली. सहा महिने काबाडकष्ट करून देखील या कामगारांना मोबदला न देता त्यांना बारामतीतून हाकलून लावण्यात आले. एव्हढेच नाही तर या मजुरांची बैलगाडी व उदरनिर्वाहाची साधने जप्त करण्यात आली आहेत. याबाबतची आपबीती कथन करून न्याय मिळण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे मात्र पोलीस यंत्रणा त्यांची फिर्याद नोंदवून घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप या मजुरांनी केला आहे.