चाळीसगाव | शहरातील घाटरोड वरील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील लिंबाचे भले मोठे झाड दिनांक १९ रोजी दुपारी २-३० वाजेच्या सुमारास अचानक उन्मळुन विजेच्या रोहीत्रावर पडले सुदैवाने त्याठिकाणी वाहने नसल्याने मोठी हानी टळली आहे.
चाळीसगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर असलेल्या हॉटेलच्या समोर असलेले भले मोठे असलेले लिंबाचे झाड आज दिनांक १९ रोजी दुपारी २-३० वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वरील मुख्य रस्त्यावर व रोडाच्या शेजारी असलेल्या विज वितरण कंपनीच्या रोहीत्रावर (डीपी) पडले अचानक एव्हडे मोठे झाड रस्त्यावर पडल्यामुळे परीसरात एकच धावपळ उडाली मात्र रविवार असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत वाहने आली नाहीत त्यामुळे कुठलीही हानी झाली नाही पण झाड रस्त्याच्या मधोमध पडल्यामुळे वाहतुक जाम झाली होती शहर वाहतुक शाखेचे स पो नि सुरेश शिरसाठ यांनी त्याठिकाणी थांबुन येणारी व जाणारी वाहतुक कृषी उत्पन्न बाजार समिती मधुन दुसऱ्या गेटने नागद रोड मार्गे वळवुन वाहतुक सुरळीत केली चाळीसगाव औरंगाबाद हा मुख्य महामार्ग असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतुक असते ती वहतुक सुरळीत करण्यात आली तर झाड रोहीत्रावर पडल्यामुळे ईलेक्ट्रीक वायर तुटुन विज पुरवठा बंद झाला होता विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुपारी ३ वाजेपासुन काम सुरु करुन ७ वाजेपर्यंत विज पुरवठा सुरळीत केली पण दोन ठिकाणचा विज पुरवठा सकाळ पर्यंत सुरळीत होणार आहे तसेच झाड मोठे असल्याने ते तोडुन व कापुन रस्ता मोकळा करण्यासाठी रात्री उशीरा पर्यंत प्रयत्न सुरु होते.