चाळीसगावातील अनेक भागात वीज गुल

0

चाळीसगाव । शहरातील भडगाव रोड रेल्वे स्टेशन परिसर, पवारवाडी, सिंधी कॉलनी, हनुमान वाडी आदी भागात 14 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून विज गुल झाल्याने रात्रभर त्या भागातील नागरिकांना अंधारात रहावे लागले. यामुळे डास मच्छरांमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी विज वितरण कंपनीच्या कार्यालयात भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता रात्रभर नॉटरिचेबल होता. हा प्रकार या फिडरवर नित्याचाच झाला असून रयत सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्षख गणेश पवार यांनी विज वितरण कंपनीकडे पाठपुरावा केला आहे. मात्र याकडे विज वितरण कंपनीचे नेहमी दुर्लक्ष केले जात आहे.