चाळीसगाव – चाळीसगाव मतमोजणी कक्षाबाहेर मतमोजणी यंत्र हॅकींग झाल्याचा प्रकार असल्याचा संशय राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव देशमुख यांनी घेतला. बीएसएनएलच्या कार्यालयाकडुन मतमोजणी कक्षाकडे एक ऑप्टीकल फायबर केबल टाकली असल्याचा आरोप झाला. त्याबाबत चौकशी करण्यात आली. याबाबत निवडणुक निर्णय अधिकारी श्री. साताळकर यांनी खुलासा केला आहे. असा कुठलाही प्रकार घडलेला नाही. याबाबत ज्या उमेदवारांने संशय
व्यक्त केला होता. त्यांना सर्व परिस्थिती अवगत करण्यात आली आहे. उमेदवारांचे समाधान झाले असून आता त्यांची काहीही तक्रार नसल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी श्री. साताळकर यांनी सांगितले आहे.
कृपया कोणीही अफवा पसरवू नये. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.