चाळीसगावातील किराणा दुकान फोडले

0

चाळीसगाव : शहरातील जुनी नगरपालिका शेजारील रथगल्लीत असलेल्या किराणा दुकानाचे कुलूप तोडून आतील गल्यात ठेवलेले 27 हजार 500 रुपयाची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. चोरट्यांनी ऐवढ्यावरच न थांबता दुकानात असलेले 300 रुपये किमतीचे पारले व मोनॅको बिस्कीटचे पुडे देखील चोरुन नेले आहेत. याप्रकरणी किराणा दुकान मालकाने दिलेल्या फिर्यादीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेले नसून नागपूर प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण पुर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सुरक्षा रक्षकांकडून प्रत्येकी 4500 रुपये प्रशिक्षण आणि इतर खर्च म्हणून घेण्यात आलेले आहे.

पारले, मोनॅकोचे पुडेही लांबविले
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील जुनी नगरपालिका जवळ रथगल्लीत काशिनाथ धर्मा अ‍ॅण्ड कंपनी या नावाचे विजय काशिनाथ कोठावदे यांचे किराणा व मयताचे तिरडीचे सामान विक्रीचे दुकान आहे. दुकानाला लागूनच त्यांचे निवासस्थान आहे. 7 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी रात्री 10 वाजता दुकान बंद केले. सकाळी दि.8 डिसेंबर रोजी सकाळी 6 वा. काही लोक मयताच्या तिरडीचे सामान घेण्यासाठी त्यांच्या दुकानाबाहेर आल्याने ते घरातूनच दुकानात आले असता त्यांना दुकानाचा समोरील दरवाजा उघडा दिसला व दुकानाच्या लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून गटारीत पडलेले दिसले आणि गल्यात ठेवलेले 27 हजार 500 रुपयाची रोकड चोरी गेल्याचे व 300 रुपये किमतीचे पारले आणि मोनॅको कंपनीचे विस्किटे देखील चोरट्यांनी चोरुन नेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सदर माहिती चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दिल्यावरुन चाळीसगाव शहर पोलिसांनी घटनास्थळावर जावून पंचनामा केला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपीविरोधात भाग 5 गुरन 167/2016 भा.दं.वि. कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार शशिकांत पाटील करीत आहेत.