गाळेधारक त्रस्त ; व्यापारी आंदोलनाच्या तयारीत , निर्भया पथक गेले कुठे ?
चाळीसगांव (अर्जुन परदेशी)- ग्रामीण भागातून दररोज सकाळी शहरात महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी हजारो विद्यार्थी मुले मुली बसेसने येतात बसस्थानकावरून काही आपल्या नियमित मार्गाने महाविद्यालयात पोहोचतात तर अनेक लफडेबाज सकाळी आल्याबरोबर सुमसान असलेल्या शॉपींग काँप्लेक्सचा अश्लील भूक भागविण्यासाठी खुलेआम वापर करीत असून या अल्पवयीन मुलामुलींचे उद्योग दिवसेदिवस वाढत असून यामुळे गाळेधारक त्रस्त झाले आहेत या प्रकाराची सोशल मीडिया वर खुलेआम चर्चा होत असून पोलिसांचे कानावर हात असून व्यापारी आंदोलनाच्या तयारीत असल्याचे वीचित्र परिस्थिती शहरातील अनेक शॉपींग काँप्लेक्स मध्ये निर्माण झाली आहे या आंबटशौकीनाकडून सर्वाधिक वापर गायत्री कॉम्प्लेक्स चा होत असल्याने हा परिसर अश्लिल चाळे करणार्यांचा अड्डा ठरत असल्याचे गंभीर चित्र निर्माण झाले आहे
सकाळी सात ते दहा सैराट
शहरात सकाळी सहा वाजल्यापासून ग्रामीण भागातून मुक्कामी बसेस यायला सुरुवात होते बहुतांश विद्यार्थी घोळक्या घोळक्याने आपआपल्या शाळेत जातात मात्र सेटिंग करून आलेले बिनधास्त आपल्या ठरल्या जागी जातात यात बसस्थानकावरून जातांना वाटेत असलेले सुमसाम गायत्री कॉम्प्लेक्स बळी ठरते आहे दररोज सकाळी पाच पंधरा नवनवीन व अनेकदा नेहमीचे प्रियकर दोघी जिन्यावरून वर जातात व तेथे जो अश्लील चाळे करण्याचा घिंगाणा चालतो हा धिंगाणा रंगलेल्या प्रियकरांकडून सकाळी दहा वाजेपर्यंत सुरू असल्याचे अनेकदा दिसून येत आहे आपली दुकानदारी उघडण्यासाठी येणार्या व्यापारी यांना तर हे सैराट चित्र दररोज बघावे लागते इतकी मुजोरी या नालायक मुलामुलींची झाली आहे. अनेकदा व्यापार्यांना या अश्लील चाळे करणार्यांच्या अरेरावी ला बळी पडावे लागत असल्याने त्यांनी ही या सैराट मुला मुलीं कडे कानाडोळा करणे पसंत केले आहे.
गायत्री कॉम्प्लेक्समध्ये त्रास वाढला ?
गायत्री कॉम्प्लेक्स मध्ये तीन चार बाजूंनी गच्ची वर जाण्यासाठी व्यवस्था आहे सकाळी हा परीसर निर्मनुष्य असतो तर वाचमन दिवस उजाडल्यानंतर निघून जातो याचा मोठा फायदा या अश्लील चाळे करणार्यां कडून घेतला जातो आहे अशीच स्थिती कमी अधिक प्रमाणात शहरातील इतर शॉपिंग सेंटर मध्ये दिसून येते आहे गायत्री कॉम्प्लेक्स मध्ये तर परवा सकाळी दहा वाजता या प्रियकरांच्या भानगडी गच्ची वरून थेट खाली येईपर्यंत झाल्या एकाने मुलीच्या हातातील मोबाईल हिसकावून फोडला दुकाने उघडण्यासाठी आलेल्या चार पाच व्यापार्यांनी त्यांना हुसकावून लावण्या चा प्रयत्न केला तर त्यांना शिव्यांची लाखोली खावी लागली इतके खालच्या थराला यांची मानसिकता गेली आहे वेळीच या प्रकारांना आळा बसावा अन्यथा व्यापारी आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
अल्पवयीन मुले मुली
शहरातील गायत्री कॉम्प्लेक्स प्रमाणे सकाळी सिग्नल चौकातून जिल्हा बँकेवरून नगरपालिकेकडे जाणारा रस्ता, गणेश शॉपिंग सेंटर, अष्टभुजा शॉपिंग सेंटर, घाटे शॉपिंग कॉम्प्लेक्स , बापजी हॉस्पिटल मार्ग यासारख्या सकाळी वर्दळ नसल्याने सूनसान असलेल्या भागात या जोड्या आढळतात यात चिंतेची बाब अशी की अल्पवयीन मुला मुलींची संख्या वाढत चालली आहे शिक्षकांचे म्हणणे आहे की आम्ही शाळा व महाविद्यालये परिसरात बारीक लक्ष ठेवतो मात्र बाहेर काय चालले याच्याशी आमचा संबंध नाही दुसरीकडे आपल्या पाल्याच्या हालचाली वर लक्ष ठेवणारे पालक यांची उदासीनता मुला मुलींच्या भविष्य धोक्यात घालणारी असल्याची ओरड शिक्षक देखील करीत आहेत
समाज चिंतकाना आवाहन?
या वाढत्या अश्लील प्रकाराबाबत शाळा महाविद्यालये यांचे मधून दररोज कारण नसताना अनेक मुली या अश्लील चाळे करणार्या मुला मुलींच्या जाळ्यात ओढल्या जात आहेत या करिता सामाजिक कार्यकर्ते, संघटना, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, सोशल कलब यांनी एकत्र येऊन या वाढत्या अश्लील चाळे करणार्या मुला मुलींचा बंदोबस्त करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे खुल्या डोळ्यांनी या परिसरात सकाळी फिरून बघा हा प्रकार खुलेआम अनुभवयास मिळतो आहे
अश्लील चाळे करणारे दादागिरी वर उतरले -व्यापारी वर्धमान धाडीवाल
मागच्या 8 दिवसा पासून गायत्री कॉम्प्लेक्स ला खेड्यावरच्या 8 ते 10 मुली जमतात व मुले ही तिथे येतात मग खूप धिंगाणा चालतो आज तर एक मुलाने त्या मुलीचा मोबाईल जोरात आदळून फोडून टाकला कॉम्प्लेक्स मध्ये आशिल्ल बोलणे व चाळे करणे चालू आसत कोणालाच घाबरत नाहीत ते जर कोणी बोलायला गेलं तर दादागिरी करतात. यांचा काही बंदोबस्त होऊ शकतो का कारण मुली खूप लहान लहान आहेत ही मुलं व मुली रांजणगाव येथील असल्याचे त्यांच्या संवादातून अंदाज असल्याची शक्यता गायत्री कॉम्प्लेक्समधील व्यापारी वर्धमान धाडीवाल यांनी जनशक्ती शी बोलताना दिली.
प्रेमवीरांचा हैदोस बघवत नाही -अॅड.प्रमोद आगोणे
अनेकदा सकाळी कामानिमित्त लवकर ऑफिसमध्ये यावे लागते नेमके माझे कार्यालय सर्वात वरच्या माळ्यावर आहे अक्षरशः या प्रेम वीरांचा हैदोस नजरेस पडतो. हा प्रकार दररोज घडत असल्याने कानाडोळा करण्याशिवाय गत्यंतर नाही किती ही बोला यांचे रोजचे झाले असल्याने दुर्लक्ष केल्या वाचून पर्याय नाही शाळेच्या सुटीच्या दिवशी हा प्रकार होत नाही यामुळे या नालायक मुला मुलींची संख्या शाळेतील व महाविद्यालयातील आहे, अशी माहिती बार असोशिएशन चे सदस्य अॅड.प्रमोद आगोणे यांनी जनशक्ती शी बोलताना व्यक्त केली आहेफ
स्वतंत्र पथक तयार करतो –पोलीस उपविभागीय अधिकारी नजीर शेख
सुम साम शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये होणार्या या प्रकारांची सखोल माहिती घेतो व या प्रकारांना आळा घालण्यासाठी लवकरच संबधित पोलीस निरीक्षक यांना सूचना देण्यात येतील व महिला कॉन्स्टेबलचा समावेश असलेले स्वतंत्र पथक तयार करून कारवाई केली जाईल, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नजीर शेख यांनी ‘जनशक्ती’शी बोलताना दिली.