चाळीसगावातील बँक ऑफ महाराष्ट्रची एक कोटी 30 लाखात फसवणूक
नाशिकच्या कर्जदारासह तत्कालीन मॅनेजरसह तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा
Bank of Maharashtra in Chalisgaon was defrauded of Rs. 1.5 Crore through forged documents in the name of vehicle loan चाळीसगाव : वाहन घेण्याच्या नावाखाली बनावट कागदपत्रांद्वारे चाळीसगावातील बँक ऑफ महाराष्ट्राची एक कोटी 30 लाख रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नाशिकच्या कर्जदारासह बँकेच्या तत्कालीन मॅनेजरसह तिघांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बनावट कागदपत्रांद्वारे घातला गंडा
चाळीसगाव शहर पोलिसात निशांत माणिकराव इलमकर (44, धुळे रोड, चाळीसगाव) यांच्या फिर्यादीनुसार, 1 ऑक्टोंबर 2021 आणि 1 जानेवारी 2022 रोजी संशयीत सुशील भालचंद्र पाटील (रा.प्लॅट नंबर 9, लोचन अपार्टमेंट, मखमलाबाद नाका, पंचवटी, नाशिक) यांनी वाहन घेण्यासाठी बनावट कागदपत्र खरे असल्याचे बँकेला भासवून ती बँकेत सादर केली. बँकेचे तत्कालीन शाखाधिकारी व हल्ली अचल कार्यालय पुणे सिटी अजय सिंग (शिवाजी नगर, पुणे) व प्रोसेसिंग अधिकारी मंदार चंद्रशेखर देशमुख (मिल गेटजवळ, फुले कॉलनी, चाळीसगाव) यांनी कागदपत्रांची प्रत्यक्ष खात्री केली नाही.
वाहन खरेदी न करता केली फसवणूक
संशयीत आरोपींनी संगणमत करून अर्जदार सुशील पाटील यांना वाहन कर्जाकरीत एकूण एक कोटी तीस लाख रुपयाचे कर्ज मंजूर करून मंजूर केले. सुशील पाटील याने बँकेकडुन वाहन कर्ज म्हणून एक कोटी तीस लाख घेत वाहन घेता बँकेची फसवणूक करीत अपहार केला. याप्र करणी तिघां संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.पोलिस निरीक्षक सागर ढिकले हे करीत आहेत.