चाळीसगाव– शहरातील संजय गांधी नगरातील रहिवासी असलेल्या संदीप उत्तम राजपूत (25) या बेपत्ता तरुणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी हनुमानवाडी परिसरातील डोळ्यांच्या धर्मांथ दवाखान्याच्या विहीरीत आढळल्याने खळबळ उडाली. बुधवारी सकाळपासून संदीप घरातून बेपत्ता झाल्याने त्यांचा शोध सुरू होता. गुरुवारी सकाळी नातेवाईकांना विहिरीजवळ संदीपची चप्पल दिसली. विहिरीत शोध घेतला असता संदीपचा मृतदेह त्यांना आढळून आला. चाळीसगाव शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक प्रेमसिंग राठोड करीत आहेत.