चाळीसगाव तालुक्यावर शोककळा ; उद्या पिंपरखेड येथे अंत्यसंस्कार
चाळीसगाव- भाजपाचे ज्येष्ठ नेते, कुशल संघटक, जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक तसेच सेवा सहकारी संस्थेचे संस्थापक, चेअरमन वाडीलाल परशराम राठोड (72) यांचे मंगळवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने चाळीसगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. जनसंघ ते भाजप पक्षाचा विस्तार करण्यात मोठा सिंहाचा वाटा असलेल्या राठोड यांच्या निधनाने पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पिंपरखेड येथील रहिवासी असलेल्या राठोड यांना मंगळवारी पहाटे छातीत दुखू लागल्यानंतर चाळीसगाव येथे उपचारार्थ हलवल्यानंतर पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
चाळीसगाव तालुक्यावर शोककळा ; उद्या अंत्यसंस्कार
स्व.राठोड यांनी पक्षाचा विस्तार वाढवण्यात मोठी भूमिका निभावली होती तर विधानसभा निवडणुकीत त्यांचा अवघ्या काही मतांनी त्यांचा पराभव झाला होता. स्व.गोपीनाथ मुंडे, स्व.प्रमोद महाजन यांचे ते निकटवर्तीय मानले जात. त्यांच्या मृतदेहावर बुधवारी सकाळी नऊ वाजता पिंपरखेड येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा तथा जिल्हा परीषद माजी सभापती राजेंद्र राठोड, भाऊ, दोन मुली असा परीवार आहे.