चाळीसगावातील लॉजमध्ये कृषी केंद्र चालकाचा मृतदेह

0

चाळीसगाव – येथील सुभाष लॉजमध्ये वाघले चाळीसगाव येथील कृषी केंद्र चालक दीपक श्रीराम पाटील (35) यांचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ते मुळ मालेगाव येथील असून हल्ली पवारवाडी चाळीसगाव येथे त्यांचा रहिवास होता. ते बेपत्ता झाल्यासंदर्भात 16 सप्टेंबर रोजी बेपत्ता झाल्यासंदर्भात नोंद करण्यात आलेली होती. 18 रोजी सायंकाळी विषारी औषध सेवन केलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळून आला.

दोन दिवसांपासून होते बेपत्ता
प्राप्त माहिती नुसार डी के स्टॉप कॉलेज रोड मालेगाव येथील मुळ रहीवासी ह मु सोन्या मारुती मंदीर मागे पवार वाडी चाळीसगाव येथील दिपक श्रीराम पाटील यांचे वाघले येथे कृषी केंद्र आहे. 16 सप्टेंबर रोजी दिपक श्रीराम पाटील हे शहरातील सिग्नल पॉईंट जवळून सायंकाळी 5-30 वाजेच्या सुमारास बेपत्ता झाल्याची नोंद चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दिनांक 18 रोजी सकाळी त्यांची पत्नीभारती दिपक पाटील यांनी केली होती त्याचा शोध चाळीसगाव शहर पोलीस करीत होते. दिपक पाटील घरुन बेपत्ता झाल्यानंतर दिनांक 16 रोजी त्यांनी शहरातील सुभाष लॉज मध्ये 111 नंबर रुम बुक केला होता ते सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास जेवणासाठी बाहेर गेले व रात्री 8-30 वाजता परत लॉजमध्ये आले होते. त्यानंतर ते पुन्हा बाहेर आले नाही; मात्र ते बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा पोलिसांच्या मदतीने शोध घेतला. त्यात त्यांच्या मोबाईलचे लोकेशन हे चाळीसगाव दिसत असल्याने त्यांनी त्यादिशेने तपास केला व लोकेशन शहरातील सुभाष लॉज येथे मिळून आले नातेवाईकांनी चौकशी केली असता त्यावेळी लॉज कर्मचारी व नातेवाईकांनी 111 नंबर रुमचा दरवाजा उघडून पाहीला असता दिपक पाटील यांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला सुभाष लॉजचे मॅनेजर किशोर नारायण कासोदे यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार राजेंद्र चौधरी करीत आहेत.