चाळीसगावातील सेवानिवृत्त शिक्षकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून लांबवली दोन लाखांची रोकड

During the day in Chalisgaon, Bhamtas handed out cash of two lakhs from the trunk of a two-wheeler
चाळीसगाव :
 तालुक्यातील टाकळी प्र.चा.येथील सेवानिवृत्त शिक्षकाने बँकेतून दोन लाखांची रक्कम काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेवल्यानंतर पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी ही रक्कम लांबवल्याची घटना सोमवारी भर दिवसा घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांचा सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध सुरू करण्यात आला आहे.

भर दिवसा लांबवली रोकड
टाकळी प्र.चा. गावातील सेवानिवृत्त शिक्षक सुधाकरराव विठ्ठल पाटील यांनी सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहरातील भडगाव रोडवरील युनियन बँकेतून दोन लाख रुपयांची रक्कम काढली व ही रक्कम त्यांनी बँकेच्या बाहेर मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवली होती. त्याचवेळी पासबुक बँकेत राहून गेल्याने ते पुन्हा बँकेत गेल्याची संधी पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी साधली.

शहर पोलिसात गुन्हा
काही वेळेनंतर सुधाकरराव पाटील हे परत आल्यावर डिक्कीत ठेवलेली रक्कम गायब झाल्याचे दिसताच त्यांनी सायंकाळी पोलिस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिल्याने अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहेत.