जळगाव । दिव्यांग असलेल्यांचे जीवन हे अंधारमय असते. अनेक दिव्यांग बांधवांचे लग्न जुळण्यात अडचण येत असते. मात्र चाळीसगाव येथील दिव्यांगासाठी कार्यरत येथील स्वयंदीप केंद्राच्या पुढाकाराने चाळीसगाव येथील दोन दिव्यांग परस्परांचे जीवनाचे आधार बनले आहे. दोघांनी एकमेकास आयुष्यभर साथ देण्याचे शपथ घेतले असून त्यांचा विवाह सोहळा मंगळवारी 23 रोजी चाळीसगाव शहरात उत्साहात पार पडला. दोघांनी आंतरजातीय विवाह करत समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. स्वयंदीप केंद्राच्या माध्यमातून अनेकांचे विवाह जुळून येत असल्याचे दिसून येते. दिव्यांगासाठी हे केंद्र वरदान ठरत आहे. अपंग बहुउद्देशीय संस्थेचा पाया रचून अपंगांचे आयुष्य फुलविणार्या मीनाक्षी निकम यांच्याशी 16 वषार्पासून सानिध्यात असणारी मनिषा चौधरी ही राकेश खैरनार यांच्याशी विवाहबध्द झाली. दोघांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन आपले आयुष्य सुकर बनविले आहे.
दोन्हीही चाळीसगाव शहराचेच
वर- वधू हे दोघेही चाळीसगाव येथीलच रहिवासी असून पोलीओमुळे एका पायाने अपंग (दिव्यांग) आहे. या विवाहामुळे ते आता एकमेकांचे आधार बनले आहे. शहरातील आर.के.लॉनवर त्यांचा विवाह सोहळा पार पडला. मनिषा चौधरीच्या वडिलांचे चहाचे दुकान असून त्यांची आर्थिक स्थिती साधारण आहे. मनिषा अपंग असली तरी वडिलांवर भार न राहता तिने ‘स्वयंदीप केंद्रा’च्या माध्यमातून स्वयंरोजगार सुरु केला तर राकेश याचे वडील बांधकाम ठेकेदाराकडे कामास आहेत.
यांची होती उपस्थिती
दिव्यांगानी आंतरजातीय विवाह करत समाजात एक आदर्श घडविला. त्यांच्या विवाहा प्रसंगी त्यांना शुभ आर्शिवाद देण्यासाठी अनेक दिग्गज मान्यवर तसेच राजकीय नेते मंडळी उपस्थित होते. डॉ.सुनिल राजपूत यांनी कन्यादान केले. यावेळी माजी आमदार राजीव देशमुख, तहसिलदार कैलास देवरे, प्रदीप देशमुख, रामचंद्र जाधव, नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते.
दोन्ही स्वावलंबी
वधूराणी मनिषा घरची परिस्थिती साधारण आहे. परिवारांवर आपला भार पडू नये यासाठी तीने फॅशन डिझाईनचे काम शिकून स्वयंरोजगार सुरु केला. राकेशचीही परिस्थिती जेमतेम या परिस्थितीतुन मार्ग काढत त्यांनी स्वः अस्तित्व निर्माण केले. स्वतःचा व्यवसाय असावा यासाठी त्याने हिंमतीने भाड्याचे दुकान घेऊन तेथे संगणकावर ऑपरेटिंगचे काम सुरु केले. त्यातुन मिळणार्या पैशातुन परिवाराचा उदरनिर्वाह केला. दोन्हीही अपंग आहे मात्र अपंग असल्याचा बाहु न करता स्वावलंबी जीवन जगण्याचा प्रयत्न केला.