चाळीसगाव । मिठाईच्या दुकानावर जाऊन येतो असे सांगून शहरातील भडगाव रोड वरील शाहू नगरातील 23 वर्षीय तरुण 5 मे 2017 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास निघून गेला असता परत आला नाही. कैलास पांडुरंग मोरे (53) धंदा सोनारी काम रा भडगाव रोड शाहू नगर, चाळीसगाव यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, त्यांचा मुलगा ऋषिकेश कैलास मोरे हा दि 5 मे 2017 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास त्यांच्या घराशेजारीच असलेल्या सोनारी दुकानातून मी मिठाई च्या दुकानावर जाऊन येतो असे सांगून निघून गेला तो परत आला नाही म्हणून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला 28/2017 प्रमाणे हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. त्याचा रंग गोरा, शरीर सळ पातळ अंगात नेव्ही ब्लू कलरचा शर्ट स्काय ब्लु रंगाची जीन्स पॅन्ट व हातावर ऋषिकेश नाव गोंदलेले असे वर्णन आहे.