चाळीसगाव । शहरातील जुना पॉवर हाऊस रोड डोहर वाडा येथून गुरुवारी 15 जून रोजी सकाळी 10 वाजता 23 वर्षीय तरुण घरातून निघून गेला असून तो अद्याप परत न आल्याने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. डोहर वाडा येथील 23 वर्षीय तरुण विक्की पापालाल खरटमल हा गावात जाऊन येतो असे सांगून घरातून निघून गेला. तो परत न आल्याने त्याचा सर्वत्र शोध घेतला. नातेवाईक व मित्रांकडे देखील त्याचा शोध घेतला परंतु तो मिळून आला नसल्याने वडील पापालाल आसाराम खरटमल यांच्या खबरीवरुन हरविल्याची नोंद करण्यात आली. रंग गोरा, उंची 5 फूट 5 इंच, नाक सरळ, अंगावर लाल रंगाचा शर्ट, पांढर्या रंगाची पॅण्ट असा विक्कीचा वर्ण आहे. पुढील तपास हवालदार मिलिंद शिंदे करीत आहे.