चाळीसगावातून १६ वर्षीय तरूण बेपत्ता

0

चाळीसगाव- येथील पीर मुसा कादरी बाबा दर्गावर उपचारासाठी आलेला तेलंगना राज्यातील 16 वर्षीय अल्पवयीन तरूण दर्गा परिसरातुन बेपत्ता झाला असुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची अमारपुरम ता.तोरुर जिल्हा मेहुबाद (तेलंगणा) येथील रहीवासी व हल्ली मुक्काम लक्ष्मी नगर, आझाद चौक ता. कोरेगाव जिल्हा सातारा येथील आयुर्वेद जडी बुटी विक्री करणाऱ्या मुबा दत्तु शिरपाटी (वय -38) यांच्या मुलाला फिट येत असल्याने त्या परिवारासह येथील पिर मुसाकादरी उर्फ बामोशी बाबा यांच्या दर्ग्यात उपचारासाठी आले होते त्यांचे सोबत 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा किरण देखील होता. दि. 18 रोजी सकाळी 10 वाजता बामोशी बाबा दर्गा परिसरात मुबा शिरपाटी या राहण्यासाठी जागा पाहण्यासाठी जातांना त्याला चहाच्या टपरीजवळ थांबवुन गेल्या होत्या. परत आल्या तेव्हा मुलगा त्याठिकाणाहुन बेपत्ता झाला होता त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो मिळुन न आल्याने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भादंवि कलम 363 प्रमाणे अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विजय साठे करीत आहेत.