चाळीसगावात अप्पर जिल्हाधिकारी व तहसिलदार यांचेकडून माणुसकीचे दर्शन

0
चाळीसगाव  -येथून सहा सात किलोमीटर असलेल्या देवळी गावाजवळ शिवणी ता. भडगांव येथील शेतकरी यांच्या दुचाकीचा अपघात झाला. तेव्हा बघ्यांची गर्दी झाली होती. त्याचवेळी वरखेडे लोंढे धरणावर अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, पुनर्वसन अधिकारी शुभांगी भारदे, तहसीलदार कैलास देवरे येथून जात असताना त्यांनी गाडी थांबवली व अत्यवस्थ  जखमींची   विचारपूस केली व त्याला शासनाच्या गाडीत चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्या दरम्यान महसूल विभागातील संदीप राजपूत, प्रवीण मोरे यांनी त्यांच्या नातेवाईक यांचा शोध घेतला व विजय पाटील यांच्या प्रकृती बाबत कळविले. देवळी येथील टायर पंक्चर वाला बापू पाटील यांनी मोलाची मदत केली. विजय पाटील यांना वेळेवर औषधोपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. शुद्ध हरपलेले जखमी विजय पाटील यांच्या जवळ ४९०० रुपये होते ते त्यांच्या नातेवाईकांना परत देण्यात आले आहे. त्यांचेवर पुढील उपचार सुरू आहेत.या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे त्या रुग्णाला जीवनदान मिळाल्याने या गोष्टी ची चर्चा तालुक्यात सुरू आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी यांनी वेळेचे भान ठेवत विजय पाटील यांच्या बाबत दाखविलेल्या समयसूचकतेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.