पोतदार शाळाजवळी घटना; मिळाल्या विषारी औषधाच्या बाटल्या
चाळीसगाव । शहरातील पोतदार शाळेच्या मागे शेताच्या विहीरीजवळ शहरातील गोपाळपुरा येथील 21 वर्षीय तरुणाचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आज दिनांक 20 रोजी सकाळी 10-30 वाजेच्या सुमारास मिळुन आला असुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राप्त माहिती नुसार चाळीसगाव शहरातील दोस्त टॉकीज मागील गोपाळपुरा येथील 21 वर्षीय तरुण गोवींदा मोहन नकवाल या तरुणाचा मृतदेह 20 एप्रिल 2018 रोजी सकाळी10-30 वाजेच्या सुमारास शहरातील पोतदार शाळेमागे बुंदेलखंडी शेत शिवारात मयताच्या वडीलांच्या शेताच्या विहीरीजवळ कुजलेल्या स्थितीत मिळुन आला आहे. मयत गोवींदा नकवाल हा तिन दिवसांपुर्वी घरातुन निघुन गेला होता त्याच्या मृतदेहाजवळ 2 विषारी औषधाच्या प्लास्टिकच्या बाटल्या मिळुन आल्या आहेत त्यामुळे त्याने विषारी औषध घेवुन आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. आज सकाळी शेताजवळ दुर्गंधी येत असल्याने काहीनी पाहीले असता त्याठिकाणी मृतदेह मिळुन आला तेव्हा मयताच्या घरच्यांनी त्याचे कपडे व चप्पल वरुन त्याची ओळख पटली. याप्रकरणी पुढील तपास पोउनि राजेश घोळवे करीत आहेत.