चाळीसगावात आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

0

चाळीसगाव। येथील धुळे रोड स्थित बी.पी.आर्टस् महाविद्यालयात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिपल्स सोशल फाऊंडेशनतर्फे मंगळवार 18 जुलै 2017 रोजी अभिवादन करून प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एस.बाविस्कर, उपप्राचार्य मिलींद बिल्दीकर, उप प्राचार्य काटे सर, उपप्राचार्य भिंगारे सर, रविंद्र पाटिल, लोंढे सर, गंगापुर सर यांच्याहस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

मान्यवरांचे मनोगत व्यक्त
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.लोंढे यांनी केले व प्राचार्य बाविस्कर, उपप्राचार्य काटे यांनी आण्णाभाऊ साठे यांच्या जिवनावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी अधिक परिश्रम पीपल्स फाउंडेशनचे अनिकेत पोळ, सागर अहिरे, राहुल पाटिल, शुभम सोनावणे, हर्षल रावते, उदय बाविस्कर, शुभम नागरे, सलमान शेख, आदेश धिवरे, रोहित ओवालकर, कमलेश वडनेरे आदींनी घेतले. शेवटी आभार अनिकेत पोळ यांनी मानले.