चाळीसगाव – चाळीसगाव मतमोजणी कक्षाबाहेर मतमोजणी यंत्र हॅकींग झाल्याचा प्रकार असल्याचा संशय राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव देशमुख यांनी रंगेहाथ पकडला आहे. बीएसएनएलच्या कार्यालयाकडुन मतमोजणी कक्षाकडे एक ऑप्टीकल फायबर केबल टाकली असल्याचे निदर्शनास आले असुन त्याबाबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ओरड केली आहे. एका संशयिताला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जागीच धरल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. राष्ट्रवादीच्या राजीव देशमुख यांनी मतमोजणी केंद्राधिकार्याकडे तक्रार केल्याने बरीच यंत्रणा राष्ट्रीय विद्यालयाच्या मागे धावपळ करत असल्याचे चित्र आहे.