चाळीसगावात उमंग सृष्टी स्कूलमध्ये हेल्पर प्रोजेक्ट साजरा

0

चाळीसगाव । येथील उमंग सृष्टी स्कूलमध्ये हेल्पर प्रोजेक्ट साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संजय पवार, संस्थापक अध्यक्षा संपदा पाटील, फियाज शेख सर, अर्जुन पाटील, सुहास पवार, साधना पाटील उपस्थित होते. यावेळी समाजामध्ये वावरत असतांना आपले कार्य कर्तव्य प्रमाणिकपणाने बजावणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर ज्योती पाटील, ट्रॉफिक पोलीस – निकम, पोलीस शिपाई – जगताप, देशाचे निवृत्त सैनिक – माधवराव देवरे, टेलर – परमेश्‍वर चव्हाण, शेतकरी हरिष, सलून चालक – सोनवणे, मिस्तरी – दीपक खोरोटे, दुधवाले – गिरजाआप्पा गवळी, शिक्षिका – विजया भोकरे, वॉचमन – जाधव बाबा, भाजी पाला विक्रेते – भोई दादा, अ‍ॅडव्होकेट – भानुदास पाटील, पोलीस हवालदार – भोसले सर, कंडक्टर – तुषार महाजन, फोटोग्राफार – हेमंत भाऊ शिरुडे, पोस्टमन – निकम काका, चर्मकार बंधू – गोरख शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

aयाप्रसंगी प्रमुख वक्ते संजय पवार यांनी सांगितले कि, प्रामाणिक पणाने आपले कर्तव्य पार पडणारे व्यक्तींना बोलवून त्यांचा सन्मान करणारी शाळा म्हणजे उमंगसृष्टी असल्याचे सांगितले. तसेच संपदा पाटील यांनी आपल्या मनोगतात प्रत्येक वेळी आपणास काहीही काम करायचे म्हटले तर आपल्या आजूबाजूला ह्या व्यक्तिमत्वांमुळे सर्व कार्य पार पडत असतात व त्याचे लाभ आपणास वेळेवर मिळतात असे सांगितले. शाळेतील वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांची जवळून ओळख करून घेतली. प्रस्ताविक भाग्यश्री व्यास मॅडम यांनी केले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी भगवान बच्छे, शालिनी भामरे, कुसुम राजपाल, मीनाक्षी शिंदे, विजया भोकरे, शीतल पाटील यांनी परिश्रम घेतले.