महिलांची सुरक्षितता व सशक्तीकरण अंतर्गत होणार कार्यक्रम कार्यक्रम
चाळीसगाव – महाराष्ट्र शासनाने १९९३ या वर्षी राज्य महिला आयोगाची निर्माती केली. आयोगाच्या प्रमुख उध्दिष्टमध्ये महिलांच्या समस्या, अधिकार यांचे सौरक्षण करणे, महिलांवर झालेल्या अन्याय अत्याचारांना वाचा फोडणे, महिलांकडून आलेल्या तक्रारीची नोंद घेणे, व कार्यवाही करणे, महिलांवर परिणाम करणाऱ्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे इत्यादी उद्धिष्टांचा समावेश असून त्याचाच एक भाग म्हणून आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स कॉलेज व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सहयोगाने गुरुवार १४ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ९ वाजता महिलांमध्ये करावयाची सामाजिक व कायदेविषयक जाणीव जागृती या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन महाविद्यालयात केले आहे.
सामाजिक व कायदेविषयक जागृती
राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांच्याहस्ते होणार आहे. चा.ए.सोसा.चे चेअरमन नारायण अग्रवाल तर अतिथी म्हणून जि.प.अध्यक्षा उज्वला पाटील, खासदार ए.टी.पाटील, आमदार उन्मेष पाटील, आमदार स्मिता वाघ, पोपट जि.प. शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे, माजी आमदार राजीव देशमुख असणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थितीचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.