चाळीसगाव । शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर 50 % नफा, शेतमालास हमीभाव देणे, संपूर्ण कर्जमाफी,स्वामीनाथन आयोग लागू करणे आदी मागण्यांसाठी शेतकर्यांनी संप पुकारला आहे. संपाला चाळीसगाव येथे उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून सोमवारी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, संभाजी सेना, रयत सेना, सह्याद्री प्रतिष्ठान आदी संघटनांनी पाठिंबा देवून रास्ता रोको करण्यात आला. सकाळी 9 वाजेच्या सुमारास पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, संघटनांचे कार्यकर्ते रेल्वे स्टेशन पासून यांनी रॅलीला सुरुवात करुन शासकीय विश्रामगृह, सिग्नल पॉईंट, तहसिल कार्यालय, घाटरोड मार्गे, बाजार समिती,रांजणगाव दरवाजा, शिवाजी घाटावरुन स्टेशन रोडने सिग्नल पॉईंट पर्यंत स्थित व्यापारी बांधवांना बंदचे आवाहन करण्यात आले. यावेळी काही व्यापार्यांनी स्वतः दुकाने बंद ठेवली होती तर काहींनी आवाहनानंतर दुकाने बंद केली. आंदोलकांना ताब्यात घेवुन सोडुन देण्यात आले.
यावेळी माजी आमदार राजीवदादा देशमुख, शिवसेना उपजिल्हा प्रमुख उमेश गुंजाळ, चित्रसेन पाटील, लक्ष्मण शिरसाठ, विवेक रणदिवे, दिलीप घोरपडे, दिनेश पाटील, शशिकांत साळुंखे, अतुल देशमुख, भूषण पाटील, प्रमोद पाटील, शाम देशमुख, नगरसेवक रामचंद्र जाधव, भगवान पाटील, साईनाथ देवरे, दिपक पाटील, शेखर देशमुख, प्रदिप निकम, शुभम पवार, अनिल निकम, रविंद्र पाटील, महेंद्र पाटील, अमोल भोसले, राजेंद्र मोरे, जालम पाटील, शिवाजी आमले, सुभाष जैन, अनिल जाधव, युवराज पाटील, प्रा.गौतम निकम, अजय पाटील, किशोर पाटील, अंबादास पाटील, यशवंत पाटील, भैय्यासाहेब पाटील, भिमराव खलाणे, बाळासाहेब फाटे, विजय गवळी, भूषण ब्राह्मणकार, ईश्वर ठाकरे, बाजीराव दौंड,युवक शहराध्यक्ष अमोल चौधरी, यज्ञेश बाविस्कर, निरज अजबे, शुभम पवार, हर्षल ब्राह्मणकार, सुस्मित देशमुख, सुधीर पाटील, अभिजीत शितोळे, कुशल देशमुख, जीवन देशमुख, आकाश पोळ,अजय पाटील, विजय शितोळे, ऋषीकेश देशमुख, पिनु सोनवणे, प्रकाश पाटील, सौरभ त्रिभुवन, भाऊसाहेब पाटील, सुदर्शन राजपूत, रविंद्र सुर्यवंशी, शरद पाटील, प्रताप पाटील, सुयोग शुक्ल, विनित गवळी, भूषण चव्हाण, शुभम मोहीते, पंकज पाटील, गुंजन मोटे, अरुण पाटील, राजेंद्र पगार, राजेंद्र जाट, भरत पाटील, किरण देशमुख, राहुल पाटील आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र बंदमुळे कृउबाची आवक निम्यावर
जळगाव । कर्ज माफीसह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी 1 जून पासून संप पुकारला आहे. महाराष्ट्र बंदच्या अगोदर कृषी उत्पन्न बाजार समितीती आवक सुरळीत सुरु होती. मात्र महाराष्ट्र बंदमुळे जळगावातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला आवक निम्यावर आला आहे. शेतकर्यांनी बाजार समितीकडे पाठ फिरविल्याने जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ 50 टक्के मालाची आवक झाली. सोमवारी माल आणणारे ही कमी व माल घेणारे ही कमीच होते. दूध पुरवठ्यावरही परिणाम होऊन 40 हजार लिटर दूध कमी आल्याचे दिसून आले.
मुख्यमंत्र्यांचा पुतळा दहन
चाळीसगाव । तालुक्यातील उंबरखेड व आडगाव येथे शेतकर्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांचा प्रतीकात्मक पुतळ्याचे अंतयात्रा काढून दहन करण्यात आले. शेतकर्यांच्या मागण्यांसाठी संप सुरु आहे. सोमवार 5 रोजी उंबरखेड रस्त्याजवळ रास्ता रोको करण्यात आला. यावेळी पोलिसांनी 18 शेतकर्यांसह 50 ते 60 जणांविरोधात मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. हवालदार रवींद्र भीमराव पाटील फिर्याद दाखल केले. रस्त्यावरील वाहने अडवून जवळपास 45 मिनिटे रास्तारोको करुन पुतळ्याचे दहन केले व जिल्हाधिकारी जळगाव यांचे आदेशाचे उलंघन केले. या प्रकरणी उंबरखेड येथील आरोपी जितेंद्र पाटील, भरत पाटील, मनोज पाटील, मुकुंद पाटील, संजय पाटील, दीपक खंडाळे, अनिल पाटील, अविनाश करपे, योगेश करपे, गोरख पाटील, विजय देवरे, सुनील अहिरे, राहुल गोसावी व आडगाव येथील प्रकाश पाटील, रावसाहेब पाटील, संभाजी पाटील, रवींद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.