चाळीसगावात कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

0

चाळीसगाव । शहरातील घाटरोडवरील महाराष्ट्र टोल काट्यासमोर पायी चालत असलेल्या महिलेला कन्नडकडून चाळीसगाव कडे येणार्‍या कारने मागून धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 14 रोजी रात्री 12:30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी घटनेनंतर अज्ञात कारचालकाविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कन्नड रोडकडून एका अज्ञात 40 वर्षीय महिला चाळीसगावकडे येत असतांना घाट रोड वरील महाराष्ट्र टोल काटा समोर रोडवर कन्नड कडून चाळीसगाव कडे येणार्‍या पांढर्‍या रंगाच्या अज्ञात कारने महिलेला मागावून धडक दिल्याने महिलेच्या डोक्याला जबर मार बसून तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी महाराष्ट्र टोल काट्याचे वचमन शे.इस्माईल शे.गुलजार (62) यांनी फिर्याद दिल्यावरुन अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार मिलिंद शिंदे करीत आहेत.